गणेशोत्सव आणि प्रल्हाद शिंदे यांची गाणी - एक अविस्मरणीय अनुभव

प्रल्हाद शिंदे यांची गाणी जोपर्यंत कानावर पडत नाहीत, तोपर्यंत गणेशोत्सवाचा खरा माहोल जाणवत नाही. माझ्या घरी तर आम्ही गणपतीच्या एक महिना आधीच डेकोरेशनची तयारी सुरू करतो. त्या संपूर्ण महिन्यात प्रल्हाद शिंदे, लता दिदी यांची भक्तीमय गाणी एकत, डेकोरेशन करण्याचा अनुभव खूप खास असतो.

माझ्या घरी गणपती जरी दहा दिवसांचा असला तरी आमच्यासाठी गणेशोत्सव एक महिना चालतो. हा काळ म्हणजे वर्षातला सुवर्ण काळ असतो असं म्हणायला हरकत नाही. गाण्यांच्या त्या भक्तिरसात बुडून सजावट करणे, घरात निर्माण होणारा तो आनंद, उत्सवाच्या तयारीचा तो सोहळा याची सर कुठल्याच गोष्टीला येत नाही. तुम्हा सगळ्यांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा!