आर्या चा खेळ आणि तिची कामगिरी

मला नेहमीच असं वाटतं की आर्या एकदम उत्तम खेळतीये. जेव्हा अंकिता कर्णधार होती, तेव्हा निक्कीने तिला खूप त्रास दिला होता. निक्की नेहमी म्हणायची की, "मी कोणताही नियम पाळणार नाही, उलट सगळे नियम मोडणार." आज निक्कीला पण हे समजलं पाहिजे की स्वतः कर्णधार असताना इतर लोक तिच्यासोबत तसंच वागतात तेव्हा कसं वाटत ते. आर्या म्हणाली होती, "Let her have the taste of her tablet."

पॅडी दादाला जान्हवीने करिअरच्या विषयावर बोललं तेव्हा देखील ‘B Team’ मधून फक्त आर्याच जान्हवीसोबत वाद घालायला गेली होती.

आर्याच्या लक्षात काही गोष्टी येत नाहीत, जसं की अभिजीतला buzzer वाजवून द्यायला पाहिजे होतं. ती मुद्दाम नाही केलं, तिच्या खरंच लक्षात आलं नाही. तसेच, विधानचं task असताना देखील, तिला लवकर कळलं नाही की गेम काय आहे.

पण, आर्याच्या खेळात खरंच "दम" आहे.